Advertisement

मंत्रीमंडळ विस्तार लांबला


मंत्रीमंडळ विस्तार लांबला
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू अाहे. त्यामुऴे अापल्या वाट्याला मंत्रीपद येऊ शकतं अशी सुप्त इच्छा असणाऱ्या भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली अाहे. त्यातच शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेलाही मंत्रीपद द्यावं लागणार असल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण अाहे. परिणामी मंत्रीमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता व्यक्त होत अाहे. मंत्रीमंडळ विस्तार होणार पण कधी ? ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्ट न केल्याने इच्छुकांच्याही पोटात गोळे अाले अाहेत.


इच्छुकांचे  लाॅबिंग

मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंचन व वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नेमणुका शिवसेनेला विश्‍वासात न घेता केल्याने शिवसेना नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. याचे पडसाद शिवसेनेत उमटत असून विस्तारात शिवसेना सहभागी होणार नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्याचबरोबर सरकारचा कालावधी अवघा एक वर्षाचा उरला असल्याने भाजपमधील वरिष्ठ नेतेही विस्तार करण्याच्या बाजूने नाहीत. मात्र, मंत्रीमंडळात येण्यासाठी अनेकांनी लाॅबिंग सुरु केलं आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

 

काही मंत्र्यांना डच्चू

येत्या चार जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपूर इथे सुरु होत आहे. तत्पूर्वी विस्ताराच्या निमित्तानं काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. पण निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी ओढावून घेण्यापेक्षा शिवसेना आणि भाजप युतीतल्या वादात मंत्रिमंडळ विस्तार लांबवणं उचित असल्याचा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.



परदेशातून मुख्यमंत्री याबाबत विचार करुन आले असतील. उर्वरित महामंडळाच्या नेमणूका भविष्यात जाहीर होतील. तसंच मंत्रिमंडळ विस्तारही केला जाईल. पण मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत त्यांनी काहीही वक्तव्य केलं नाही. त्यामुळं मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होणार का यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की आमचं काम एका सूरात सुरु असून कोणतेही हेवेदावे नाहीत.

 - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री



हेही वाचा -

विधानपरिषद निवडणूकीत युतीत सत्तासंघर्ष

शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा