Advertisement

शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा


शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा
SHARES

मागील ८ दिवसांपासून दिल्लीमध्ये नायब राज्यपालांच्या कार्यालयात अांदोलन करत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केरळचे मुख्यमंत्री  पी. विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अांध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अाणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पाठिंबा दिला अाहे. या पाठोपाठ अाता महाराष्ट्रात अाणि केंद्रात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने केजरीवाल यांना उघड पाठिंबा दिला अाहे. रविवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अाणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. 


अांदोलन वेगळ्या प्रकारचं

राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, अरविंद केजरीवाल यांच्याशी जे काही होत अाहे ते बरोबर नाही. केजरीवाल यांचं अांदोलन वेगळ्या प्रकारचं अाहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. केजरीवाल यांना दिल्लीच्या जनतेनं निवडलं अाहे.  त्यांना दिल्लीसाठी काम करण्याचा अधिकार अाहे. कारण हे जनतेने निवडून दिलेलं सरकार अाहे. 


काँग्रेस लांबच 

काँग्रेस मात्र या प्रकरणी अद्याप चार हात लांबच अाहे. केजरीवाल यांनी अांदोलन समाप्त करावं असं काँग्रेसनं म्हटलं अाहे. याअगोदर बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानंतर अाता शिवसेनेचाही पाठिंबा अरविंद केजरीवाल यांना मिळाला अाहे. 



हेही वाचा - 

जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा!

'आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा चेहरा समोर आला' - अशोक चव्हाण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा