जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा!

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच राऊत जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत.

SHARE

भारतीय राजकारणात कामगार नेते अशी ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच राऊत जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. 


चित्रपटाचं नाव काय?

चित्रपटाची कथा तयार असून या चित्रपटासाठी योग्य चमूची निवड प्रक्रिया सुरू आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषेत बनवला जाईल. मात्र या चित्रपटाचं नाव अजून स्पष्ट झालेलं नाही. 

सध्या बाळासाहेबांवर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर फर्नांडिस यांच्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीला सुरूवात करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


राऊत यांनी दिला आठवणींना उजाळा

यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले 'बाळासाहेबांवर टीका करणारे नेते म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख आहे. बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस हे एकमेकांचे राजकीय शत्रू असले तरी पडद्यामागे ते एकमेकांचा खूप आदर करायचे. २००५ साली वाजपेयी आणि शरद पवारांसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. त्यावेळी फक्त जॉर्ज फर्नांडिस यांनीच बाळासाहेबांचा उल्लेख बाळ असा केला होता'.


हेही वाचा - 

बिग बींच्या आठवणीतले बाळासाहेब

असा दिसतोय नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या लूकमध्ये!

संबंधित विषय
ताज्या बातम्या