Advertisement

असा दिसतोय नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या लूकमध्ये!

या सिनेमात नवाजचा लुक कसा असणार आहे? यावरूनही त्याचे चाहते आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु असून त्याच्या लुकचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असा दिसतोय नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या लूकमध्ये!
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या सिनेमाची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. संजय राऊत स्वत: या सिनेमाची निर्मिती करत असून अभिजित पानसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी करणार आहे.



नवाजच्या अभिनयाबद्दल तसं इंडस्ट्रीमध्येच काय, पण सामान्य प्रेक्षकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्येही कोणालाही शंका नसावी. मात्र, तो खुद्द बाळासाहेब ठाकरेंची भूमिका कशी साकारेल, याविषयी मात्र आत्तापासूनच चर्चा सुरु झाल्या आहेत.



गुरूवारी मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये या सिनेमाचा टीझर आणि फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. 



हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात नवाजचा लुक कसा असणार आहे? यावरूनही त्याचे चाहते आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु असून त्याच्या लुकचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.





हेही वाचा

सावध असा...बाळासाहेबांचा 'ठाकरे' येतोय!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा