Advertisement

'आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा चेहरा समोर आला' - अशोक चव्हाण

सीआयए ही गुप्तचर संघटना असल्यामुळे या संघटनाबाबत त्यांच्याकडे नक्कीच काही गुप्त अहवाल, पुरावे असतील. ते मागवून घ्यावेत आणि त्याची पडताळणी करून या संघटनांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. पण सरकारमध्ये या संघटनांच्या विचारांचे लोक असल्याने ते या संघटनांच्या विघातक कारवायांवर पांघरून घालत आहेत, किंबहुना या संघटनांना सरकारचा पाठिंबा असल्यानं त्यांच्या गुप्त कारवायांना आळा घालण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे.

'आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा चेहरा समोर आला' - अशोक चव्हाण
SHARES

अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.


संघ ही एक राजकीय संघटना

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त सांस्कृतिक संघटना राहिली नसून, ती एक राजकीय संघटना झाली आहे. केंद्र आणि विविध राज्यातील भाजप सरकारमध्ये संघाचे लोक महत्त्वाच्या हुद्द्यावर बसले आहेत. विविध संस्थांवर संघाचे लोक नेमले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राजकीय संघटना आहे. भाजप सरकार हे या संघटनेच्या विचारांचं आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार आहे. म्हणूनच संघ आणि संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांच्या कारवाया भाजप सरकारच्या काळात वाढल्याची' टीप्पणी चव्हाण यांनी केली आहे.


'यांच्यावर कायदेशीर कारवाई करा'

सीआयए ही गुप्तचर संघटना असल्यामुळे या संघटनाबाबत त्यांच्याकडे नक्कीच काही गुप्त अहवाल, पुरावे असतील. ते मागवून घ्यावेत आणि त्याची पडताळणी करून या संघटनांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. पण सरकारमध्ये या संघटनांच्या विचारांचे लोक असल्याने ते या संघटनांच्या विघातक कारवायांवर पांघरून घालत आहेत, किंबहुना या संघटनांना सरकारचा पाठिंबा असल्यानं त्यांच्या गुप्त कारवायांना आळा घालण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. सीआयएचा अहवाल पुराव्यानिशी देशातील जनतेसमोर आला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचं खा. चव्हाण म्हणाले.


हेही वाचा - 

इंधनावरील अधिभार कमी करा- अशोक चव्हाण

कर्नाटकात काँग्रेसचंच सरकार- अशोक चव्हाण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा