Advertisement

कर्नाटकात काँग्रेसचंच सरकार- अशोक चव्हाण

काँग्रेसने लोकशाहीचा नेहमी आदर केला आहे. कर्नाटकात शनिवारी काँग्रेस बहुमत सिद्ध करून सरकारची स्थापना करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. ते काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' आंदोलनात बोलत होते.

कर्नाटकात काँग्रेसचंच सरकार- अशोक चव्हाण
SHARES

निवडणूक झाली की आमदार पळवायचे, पैसे वाटायचे, फोडाफोडीचं राजकारण करायचं, पोलिसांचा दबाव आणायचा, असलं घाणेरडं राजकारण भाजपा करत आहेत. काँग्रेसने असं कधीच केलेलं नाही, आम्ही नेहमी जनतेचा कौल ऐकला, लोकांच्या निर्णयाचं स्वागत केलं. काँग्रेस नेहमी लोकांच्या बाजूने उभे राहिली. काँग्रेसने लोकशाहीचा नेहमी आदर केला आहे. कर्नाटकात शनिवारी काँग्रेस बहुमत सिद्ध करून सरकारची स्थापना करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. ते काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' आंदोलनात बोलत होते.



'लोकशाही वाचवा' आंदोलन

बहुमत नसतानाही भाजपाने कर्नाटकात सत्ता स्थापन करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीची अशी थट्टा झालेली आहे. असं म्हणत या प्रकाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत 'लोकशाही वाचवा' दिवस आयोजित करून सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसतर्फे आझाद मैदान आणि अमर जवान ज्योतीजवळ हे आंदोलन करण्यात आलं.


लोकशाही धोक्यात

यासंदर्भात अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ''भाजपाने भारतातील लोकशाही धोक्यात आणली आहे. राज्यपाल देश चालवत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गोवा, मणिपूर, मेघालय आणि आता कर्नाटकात राज्यपालांनी भाजपाच्या दबावाखाली निर्णय दिलेले आहेत. राजभवन सत्ताधाऱ्यांचा अड्डा बनलेला असून सर्व सूत्रे राजभवनातून हलत आहेत. कर्नाटकचे राज्यपाल आरएससएसचे कार्यकर्ते आहेत. नरेंद्र मोदींच्या गुजरात मंत्रिमंडळात ते होते, त्यामुळेच बहुमत नसतानाही त्यांनी भाजपाच्या बाजूने निकाल दिला.''



सरकारी यंत्रणा गुंडगिरीपुढे झुकल्या

या आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम म्हणाले, ''भाजपाने सर्व सरकारी संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. या संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या जोडगोळीच्या दबावाखाली काम करत आहेत. भाजपाच्या गुंडगिरीपुढे सर्व यंत्रणा झुकलेल्या असताना सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी संध्याकाळपर्यंत कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश भाजपाला दिले आहेत. या निर्णयामुळे काँग्रेसला निश्चित आनंद झाला आहे. भाजपाला बहुमत सिद्ध करण्यात अपशय येणार असल्याने काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.''



हेही वाचा-

मोदींच्या बुलेट ट्रेनविरोधात ठाकरे बंधू एकवटले!

कर्नाटकात शिवसेनेवर नामुष्की, सर्व उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा