Advertisement

'मग लोकशाहीची हत्या कशी?' - संजय राऊत

भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यावरून भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला अशी ओरड काँग्रेस करत आहे. मात्र देशात लोकशाही शिल्लकच राहिलेली नाही, तर तिची हत्या कशी होईल? असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

'मग लोकशाहीची हत्या कशी?' - संजय राऊत
SHARES

कर्नाटक विधानसभेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर करत असलेली कुरघोडी संपूर्ण देश बघतोय. यात भाजपने बाजी मारून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यावरून भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला अशी ओरड काँग्रेस करत आहे. मात्र देशात लोकशाही शिल्लकच राहिलेली नाही, तर तिची हत्या कशी होईल? असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


विरोधकांची टीका

येडियुरप्पा यांच्या शपथविधीनंतर काॅंग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार निदर्शनं केली. सोबतच विरोधकांनी 'ही तर लोकशाहीची हत्या असल्याची' टीका देशभर सुरू केली आहे. विरोधकांकडून टीकेची झोड उठवल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.


काय म्हणाले राऊत?

'देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, मग लोकशाहीची हत्या कशी होईल?' असा टोला खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीवर हाणला आहे.


बहुमत सिद्ध करणं कठीण

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करणं कठीण असणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचं निमंत्रण दिलं आहे. तरीही येडियुरप्पा यांना येत्या 24 तासात सर्वोच्च न्यायालयात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागेल.


हेही वाचा - 

'मग बॅलेट पेपरने निवडणुका घेऊन दाखवा' - उद्धव ठाकरे

कर्नाटक निवडणूक होताच पेट्रोल-डिझेलचा भडका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा