Advertisement

'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो' - राज ठाकरे


'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो' - राज ठाकरे
SHARES

'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो', असं ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकमध्ये भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.


 

देशभरात भाजपाची लाट ओसरताना 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात मात्र भाजपाची जादू दिसून येत आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून कर्नाटक निकालावर खोचक टिप्पणी केली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. यापूर्वीही राज यांनी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका व्यक्त केली होती.

राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ट्विटरवरून कर्नाटक निवडणूक निकालाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

भाजपने कर्नाटकात मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. तिकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनीही ईव्हीएम मशिनचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा