Advertisement

भाजपला एकतर्फी विजय मिळतो, हे मला पटलेलं नाही- जयंत पाटील


भाजपला एकतर्फी विजय मिळतो, हे मला पटलेलं नाही- जयंत पाटील
SHARES

कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती भक्कम असताना तेथील लोकं काँग्रेस पक्ष आणि तिथल्या सरकारच्या कामगिरीविषयी निगेटिव्ह बोलत नव्हते. काँग्रेससाठी एकंदरीत वातावरण मस्त होतं. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसचा विजय होईल, असं वाटत होतं. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत होता. असं असतानाही भाजप एकतर्फी विजय कसा मिळवू शकते, हे मला अद्याप पटलेलं नाही. यावर माझा विश्वासच बसत नाहीये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.


ग्राऊंड रिअॅलिटी वेगळी

कर्नाटकमध्ये ग्राऊंड लेव्हलवरून अशी माहिती मिळाली होती की, काँग्रेस पक्ष बहुमताने सरकार स्थापन करेल. पण आजचे निकाल पाहिले तर एवढ्या मोठया प्रमाणात भाजप निवडून येणं आणि काँग्रेसचं संख्याबळ कमी होणं, हे त्या फिडबॅकशी सुसंगत नव्हतं. ग्राऊंड रिअॅलिटीमध्ये लोकांच्या मनात असतं तेच फिडबॅकमध्ये दिसतं. पण तिथल्या लोकांच्या मनात जे होतं त्यात आणि जे निकाल लागले त्यात सुसंगती अाहे, असं मला वाटत नाही, अशी शंकाही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


हेही वाचा -

'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो' - राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा