Advertisement

विधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष


विधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष
SHARES

सत्तेसाठी भाजपा अाणि शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा युतीतील सत्तासंघर्ष पहायला मिळणार अाहे. २५ जूनला विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक होत अाहे. या निवडणूकीत काँग्रेसने एकही उमेदवार दिला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस एकच जागा लढणार अाहे. त्यामुळे सत्तेची फळ एकत्रित चाखणारे भाजपा अाणि शिवसेना पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.कार्यकाल संपल्याने निवडणूक

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जनता दलाचे कपिल पाटील, भाजपचे निरंजन डावखरे आणि डॉ. अपूर्व हिरे यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने मुंबई व कोकण पदवीधर अाणि मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत अाहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारली असून बोरिवलीचे पक्ष विभागप्रमुख विलास पोतनीस यांना संधी दिली अाहे. येथून भाजपकडून अमित मेहता मैदानात आहेत.

नाशकात भाजपचे अनिकेत पाटील आणि हिंदुस्तान जनता पार्टीचे सुरेश पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने येथे उमेदवार दिला नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी शेंडगे तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनिल देशमुख आणि विद्यमान अामदार जनता दलाचे कपिल पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपकडून निरंजन डावखरे, सेनेकडून संजय मोरे तर राष्ट्रवादीकडून नजीम मुल्ला यांच्यात लढत होईल.
या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. 

- अशोक चव्हाण,  प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसहेही वाचा -

लालू यांच्यावर मंगळवारी मुंबईत शस्त्रक्रिया

शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा