SHARE

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव मंगळवारी पटनाहून मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार अाहे. हृदयाला जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात येणार अाहे. याअगोदर लालू २२ मे ला मुंबईत उपचारासाठी अाले होते.  वैद्यकीय कारणासाठी ६ महिने रांची तुरूंगातून सुटलेले लालू प्रसाद यादव यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये उपचार केले जात अाहेत. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ते २ अाठवड्यांसाठी पाटनाला परत गेले होते. फिस्तुलाची शस्त्रक्रिया 

डाॅक्टरांनी फिस्तुलाची शस्त्रक्रिया अावश्यक असल्याचं सांगितलं अाहे. त्यानंतर किडनीचे उपचार केले जातील. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे किडनीची शस्त्रक्रिया शक्य नाही. त्यामुळं २ अाठवड्यात हिमोग्लोबिन वाढवण्याचा सल्ला दिला अाहे. त्यांचं हिमोग्लोबिन अाता ९.९ टक्के अाहे. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रियेसाठी हिमोग्लोबिन कमीत कमी ११ टक्के असणं अावश्यक अाहे. हेही वाचा - 

अरविंद केजरीवाल यांना शिवसेनेचा पाठिंबा

जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार सिनेमा!संबंधित विषय
ताज्या बातम्या