अत्यावश्यक वाहने अडवल्यास, वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा

करोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. मात्र दुसरीकडे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना देखील केंद्र सरकारकडून याची घोषणा झाल्यानंतर मुंबई पोलीस पुर्ण अॅक्शनमध्ये आले आहेत. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू नेणाऱ्या चालकांनाही मारहाण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अखेर वाहतुक पोलिसांनी नागरीकांच्या मदतीसाटी हेल्पलाईन सुरू केली आहे

हेही वाचाः- Coronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'

पोलिसांनी रस्त्यावर दिसेल त्याला पोलिसांनी हटकण्यास सुरुवात केली. तर मोदींच्या घोषणेमुळे शहरातील डी मार्ट, मार्केटमध्ये नागरीकांनी एकच गर्दी केली. जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी उसळलेली गर्दी पाहिल्यानंतर पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरुवात केली. कारण लॉकडाऊनमधुन जीवनावश्यक वस्तुंची ने-आण तसेच काही किराणा दुकाने वगळल्याची घोषणा न झाल्याने नागरीक संभ्रमात होते. तर काही अंशी पोलीस दलाची देखील हीच अवस्था झाली होती. याचा फटका नागरीकाना तसेच जिवनावश्यक वस्तुंची ने-आण करणाऱया गाड्याना बसण्य्ाास सुरुवात झाली. कारण या सर्वांवर पोलिसांनी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केल्याने, यापकारच्या अनेक तक्रारी पोलीस नियंत्रण कक्ष आणि राज्य सरकारकडे येण्यास सुरुवात झाली. यामुळे अखेर केंद्र तसेच राज्य सरकारने लॉकडाउनची मागदर्शक तत्वे जाहीर केली.यामध्ये जीवनावश्यक वस्तुंची ने-आण तसेच किराणा दुकाने, मेडीकल शाॅप्स वगळण्यात आल्याचे घोषीत केले.

हेही वाचाः- Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

त्याचप्रमाणे, जिवनावश्य्ाक वस्तुं खरेदी करताना मुख्यत्वे गर्दी टाळावी अशा प्रकार सुचना पोलिसांसाठी देण्यात आल्या. दरम्यान, नागरीकांकडून लाॅकडाऊनचे  उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलीस आयुक्तांनी शहरात 188 अन्वये अटकेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत. आत्तापर्यंत जगभरात 14 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात 24 तासांत रुग्णांची वाढ होऊन ती 122 वर पोहोचली आहे. मागील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे काही रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्य्ाातच पंतप्रधानानी घोषीत केलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरात गोंधळाचे वातावरण होते. मात्र वेळीच राज्य सरकारने पोलीस दलाला सुचना केल्याने, जीवनावश्यक वस्तुंच्या ने-आण तसेच खरेदी-विक्री संदर्भात सुट देण्यात आली. त्याचप्रमाणे, जिवनावश्यक वस्तुंची ने-आन अथवा ज्या कायर्यालयीन कर्मचाऱयांना ड्युटीवर येण्यास सांगितले आहे. अशा नागरीकाबा रस्त्यावर देखील काही समस्या आल्यास यांच्यासाठी वाहतुक पोलिसांनी कोरोना ट्रॅफीक हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनवर करा संपर्क

24937747 / 24937755

पुढील बातमी
इतर बातम्या