विदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी केनियन महिलेला अटक

विदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी सीआयएसफच्या अधिकाऱ्यांनी एका केनियन महिलेला अटक केली आहे. उन्शूर फरीहीया हुसैन असं या महिलेचं नाव आहे. तिच्याजवळून ९ लाख १२ हजार रुपयांचे यूएस डाॅलर हस्तगत केले आहेत. पुढील चौकशीसाठी तिचा ताबा कस्टमच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

मूळची केनियाची रहिवाशी असलेली  उन्शूर ही काही दिवसांपूर्वी टूरिस्ट व्हिजावर भारतात आली होती.  बुधवारी उन्शूर ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. ती पुढे अदिस आबाबा येथे जाणार होती.  तपासणीत तिच्याकडे १२ हजार यूएस डाॅलर आढळल्याने सीआयएसफच्या अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने ही रक्कम इथीओपीयन एअरवेजने अदिसअबाबा येथे घेऊन जाणार असल्याची कबुली दिली. या प्रकरणी अधिक तपासासाठी तिचा ताबा सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी कस्टमच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.


हेही वाचा -

५० गुन्हे असणाऱ्या नेपाळी दरोडेखोराला अटक

गोवंडीत माथेफिरूच्या हल्ल्यात १ ठार, ३ जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या