५० गुन्हे असणाऱ्या नेपाळी दरोडेखोराला अटक

. मूळचा नेपाळचा रहिवाशी असलेला थापा २००७ पासून शहरात घरफोडीचे गुन्हे करत आहे. पोलिसांनी त्याला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली. मात्र जामीनावर बाहेर पडत थापाने पून्हा चोऱ्या करण्यास सुरूवात केली.

५० गुन्हे असणाऱ्या नेपाळी दरोडेखोराला अटक
SHARES

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात ५० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत दरोडेखोराला मुंबईच्या गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे.  राहुल रामसिंग थापा (४०) असं या दरोडेखोराचं नाव आहे

शहरातील दरोड्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने जोरदार कारवाईला सुरुवात केली होती. अशातच, एक सराईत दरोडेखोर ऐरोली येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष तीनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली.  त्यानुसार त्यानी सापळा लावत राहुल थापाला अटक केली. मूळचा नेपाळचा रहिवाशी असलेला थापा २००७ पासून शहरात घरफोडीचे गुन्हे करत आहे. पोलिसांनी त्याला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली. मात्र जामीनावर बाहेर पडत थापाने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरूवात केली.

 चौकशीत त्याच्यावर पवई हद्दीत २० गुन्हे असल्याचे उघड झाले. तसंच अटक झाल्यानंतर जामिनावरुन बाहेर आल्यावर त्याने नवी मुंबई, ठाणे परिसरात ३० गुन्हे केले असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने, घड्याळे, रोकड असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं गुन्हे शाखा ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक खोत यांनी सांगितलं.


हेही वाचा -

गोवंडीत माथेफिरूच्या हल्ल्यात १ ठार, ३ जखमी

निलंबित पोलिस अधिकारी १२ वर्ष करत होता उजबेकिस्तान महिलेवर बलात्कार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा