गोवंडीत माथेफिरूच्या हल्ल्यात १ ठार, ३ जखमी

शेजारी राहणाऱ्या महिलेचा राग मनात ठेवून अरविंद गोवंडीच्या भर बाजारात चाकू घेऊन लोकांना भीती दाखवत होता. त्याच वेळी शेजारी राहणारी महिला त्याला समोर दिसली. क्षणाचा ही विचार न करता त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला.

गोवंडीत माथेफिरूच्या हल्ल्यात १ ठार, ३ जखमी
SHARES

गोवंडीतील बैंगनवाडी रोड नंबर १३ येथे एका माथेफिरूने नशेत  भीती दाखवण्याच्या हेतूने फिरवलेल्या चाकू हल्ल्यात एक ठार तर ३ जखमी झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. या हल्ल्यात जयेश गुप्ता याचा मृत्यू झाला आहे. तर तिघांवर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अरविंद यादव या माथेफिरूला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

गोवंडीच्या बैंगनवाडी रोड नंबर १३ येथे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी अरविंद नशेत होता. शेजारी राहणाऱ्या महिलेचा राग मनात ठेवून अरविंद गोवंडीच्या भर बाजारात चाकू घेऊन लोकांना भीती दाखवत होता. त्याचवेळी शेजारी राहणारी महिला त्याला समोर दिसली. क्षणाचा ही विचार न करता त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला. वेळीच त्याला रोखण्यासाठी शेजारी पुढे आले. मात्र, आरोपीने मध्यस्थी करणाऱ्या लोकांवरच चाल करून हातातील चाकूने हल्ला केला. यावेळी १ युवक आणि २ महिला आरोपीच्या समोर येताच त्याने जयेश गुप्ता या युवकाच्या छातीमध्ये चाकू खुपसला. गंभीर जयेशला तातडीने पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं. हत्येची माहिती मिळून देखील पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशीर केला. त्यामुळे लोकांच्या मनात रोष होता. बैंगनवाडी, गोवंडी परिसरातील लोकांचा मोठा जमाव शताब्दी रुग्णालयाच्या परिसरात जमा झाला होता. याठिकाणी लोकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. जबाबदार असणाऱ्या पोलिसांना आणि आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली.हेही वाचा -

निलंबित पोलिस अधिकारी 12 वर्ष करत होता रशियन महिलेवर बलात्कार

मल्ल्या, नीरव मोदीसाठी 'इथं' बनतोय खास तुरूंग
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा