मल्ल्या, नीरव मोदीसाठी 'इथं' बनतोय खास तुरूंग

कुख्यात गुंड अबू सालेमनेही मुंबईतील कारागृह व्यवस्थेबाबत पोर्तुगाल सरकारचं लक्ष वेधलं होतं. तर शीना बोरा हत्याकांडमधील आरोपी पीटर मुखर्जी व इंद्रायणी मुखर्जी यांनीही वकिलांमार्फत कारागृहातील त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

SHARE

विविध आर्थिक घोटाळ्यांमधील आरोपी हे उच्चभ्रू असल्याने या आरोपींना इतर सराईत गुन्हेगारांसोबत ठेवणं धोकादायक असल्यामुळेच या उच्चभ्रू आरोपींसाठी विशेष कारागृह बनवण्यात यावे, अशी मागणी जेल प्रशासनाकडून करण्यात आली होती. या विशेष कारागृहासाठी नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि डायमंड किंग नीरव मोदी यांचे भारतात प्रत्यापर्ण झाल्यास त्यांनाही या जेलमध्ये हलवलं जाऊ शकतं. 

पंजाब नॅशनल बँकेची (PNB) १३ हजार कोटी रुपयांना फसवणूक करून भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला भारतात आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या न्यायालयाने त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली असली तरी लंडनमधून आलेल्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ठेवण्यात येणाऱ्या आर्थर रोड कारागृहाची पाहणी केल्यानंतर कारागृहातील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. कुख्यात गुंड अबू सालेमनेही मुंबईतील कारागृह व्यवस्थेबाबत पोर्तुगाल सरकारचं लक्ष वेधलं होतं. तर शीना बोरा हत्याकांडमधील आरोपी पीटर मुखर्जी व इंद्रायणी मुखर्जी यांनीही वकिलांमार्फत कारागृहातील त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

त्यामुळेच मल्ल्यासह नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिल्यास त्याला कुठल्या तुरूंगात ठेवण्यात येईल, तिथं काय सुविधा असतील याची माहिती लंडन न्यायालयाने मागवली होती. आर्थर रोड कारागृहातील या खोलीचा आकार २५ बाय १५ फूट एवढा असून इतर खोल्यांच्या तुलनेत या खोलीचा आकार मोठा आहे. या खोलीत ३ पंखे ६ ट्युबलाईट असून खोलीला २ खिडक्याही आहेत. त्यानुसार ही खोली प्रकाशमान आणि हवेशीर आहे. कैद्याला आपलं खासगी सामान ठेवण्यासाठी खोलीत स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं कळवलं होतं. मात्र लंडन प्रशासनाकडून त्यातही अनेक त्रुटी काढल्या होत्या. त्या माहितीनंतर आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसाठी स्वतंत्र कारागृह बांधण्यात येण्याबाबतच्या प्रस्तावाकडे गृह विभागाने लक्ष वेधलं. त्यानुसार मुंबईत फक्त तळोजा कारागृहातच मोकळी जागा उपलब्ध असल्याने या विशेष कारागृहासाठी तळोजा कारागृहात जागांची पाहणी करण्यात आली आहे.

 लंडनमधील या कारागृहांची रचना कशा प्रकारे केली आहे, त्या ठिकाणी उच्चभ्रू आरोपींंची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे, काय काय सुविधा तेथील कारागृहातील आरोपींना दिल्या जातात, याची पाहणी करण्यासाठी लवकरच कारागृह आणि गृह प्रशासनातील अधिकारी लंडनला भेट देणार आहेत. त्यानुसार कारागृहांची बांधणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लंडनमधील कारागृहातील आरोपींना व्यायामासाठी तसंच मनोरंजनासाठी ठराविक वेळेत बाहेर येण्याची परवानगी मिळते. त्याला स्वच्छ पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कपडे धुण्याची सुविधा मिळेल. या बराकीत नियमीत सुनावणीसाठी व्हिडिओ काॅन्फरसिंगची देखील सुविधा आहे. ही बराक अत्यंत सुरक्षित असल्याने तसंच बराकीबाहेर प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असल्याने आरोपीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं लंडन प्रशासनाने नीरव मोदी प्रकरणात आर्थर रोड कारागृहाला पाठवलेल्या अहवालात म्हटलं होतं.हेही वाचा -

पत्नीशी भांडण झाल्याने बापाने केली मुलांची हत्या

अभिनेता सलमान खानच्या घरातून सराईत आरोपीला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या