पत्नीशी भांडण झाल्याने बापाने केली मुलांची हत्या

काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले असल्याने पत्नी रागाने माहेरी निघून गेली होती. पत्नीच्या या आडमुठे पणाला कंटाळून चंद्रकांत मोहितेने मुलांची हत्या करून आत्महत्

SHARE

पत्नीच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलांची हत्या करून मृतदेह गाडीच्या डिकीत टाकून निर्दयी बाप गावी निघाला होता. मात्र, याची माहिती मिळताच त्या निर्दयी बापाला पोलिसांनी शिरवळ येथे बेड्या ठोकल्या. चंद्रकांत मोहिते असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी शिरवळ पोलिस अधिक तपास करत आहेत.  

घाटकोपरच्या जागृतीनगर परिसरात चंद्रकात मोहिते हा पत्नी आणि दोन मुलांसोबत मागील अनेक वर्षांपासून राहत होता. चंद्रकांत हा ओला गाडीवर चालक आहे. मागील अनेक दिवसांपासून मोहिते हा आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मोहितेच्या आजारपणाला कंटाळून त्याचे पत्नीसोबत वारंवार भांडण होत असे. दरवेळी भांडणानंतर पत्नी माहेरचा रस्ता धरत असल्याने मोहिते  कंटाळला होता. काही दिवसांपुर्वीच दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळेे पत्नी रागाने माहेरी निघून गेली होती. पत्नीच्या या आडमुठेपणाला कंटाळून चंद्रकांत मोहितेने मुलांची हत्या करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी दुपारी पत्नी भांडण करून माहेरी निघून गेल्यानंतर चंद्रकांत मुलांची हत्या करून मृतदेह गाडीच्या डिकीत ठेवून  पुण्याच्या दिशेने रवाना झाला. रस्त्यात त्याने या घटनेची माहिती भावाला फोन करून दिली.

त्यानंतर भावाने ताबडतोब घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चंद्रकांतच्या गाडीला असलेल्या जीपीएस माध्यमातून त्याचा माग काढत त्याला साताराजवळ शिरवळ येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. चंद्रकांतच्या गाडीची झडती घेतली असता मोटारीच्या डिकीत दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले. शिरवळ पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता मुलांना मीच गळा आवळून मारले आणि मीसुद्धा आत्महत्या करणार होतो, अशी कबुली  दिली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी चंद्रकांतला गुन्हा दाखल करून अटक केली आहे.हेही वाचा -

अभिनेता सलमान खानच्या घरातून सराईत आरोपीला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या