बनावट नोटा तस्करीत ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हाथ

बनावट नोटा तस्करी प्रकरणाला आता वेगळ वळण मिळालं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींमागे एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि तिच्या आईचा हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लवकरच गुन्हे शाखेचे पोलिस त्या अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावू शकतात. या अभिनेत्रीसह त्या टोळीवर तामिळनाडूत ही गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. तसेच आरोपींना हे कृत्य अभिनेत्री आणि तिच्या आईच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. 

हेही वाचाः-Coronavirus Updates: अखेर IPL पुढे ढकलली; १५ एप्रिलपासून सुरू होणार

पाकिस्तानामार्गे काही दिवसांपूर्वीच २४  लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतून बनावट नोटांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी २ लाख ९५  हजारांच्या नोटा जप्त केल्या,   डॉन वरकी (२६) आणि विष्णू विजयन (२८) अशी या दोघांची नावे आहेत.  या प्रकरणात अद्याप अजून एक आरोपी फरार आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड अद्याप फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. या दोघांच्या चौकशीत त्यांनी या रॅकेटमागे दाक्षिणात्य अभिनेत्री सुर्या ससिकुमार आणि तिच्या आईचा हात असल्याचे सांगितले. मागील वर्षीच या टोळीला तामिळनाडू पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अटक केली होती. त्यात ही सुर्या ससिकुमार आणि तिच्या आईचे नाव समोर आले होते. सध्या अटकेत असलेले आरोपी हे  नवी मुंबई परिसरात वास्तव्यास होते. या दोन्ही आरोपिना कोर्टाने १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचाः- Coronavirus Updates: मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मिळणार सॅनिटायझर

आरोपीं वास्तव्यास असलेल्या ठिकाणी धाडी टाकून बनावट नोटा बनवण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे..यामध्ये लॅपटॉप, प्रिंटर, टॅब, आरबीआय असे लिहिलेल्या पितळी पट्ट्या, वॉटरमार्क असलेले पेपर, आणि इतर साहित्याचा समावेश आहे.मुंबईत बाहेरून बनावट नोटा वारंवार येत असल्याचे समोर येत असल्याने हे प्रकार हाणून पाडण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी सक्रीय झाले आहेत. या टोळीला केरळ पोलिसांनी २०१८मध्ये अटक केली होती. पोलिसांनी आरोपींच्या चौकशीतून दाक्षिणात्य टीव्ही अभिनेत्री सूर्या हिच्या बंगल्यावर छापा घातला. तेथे बनावट नोटांचा छापखाना अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी सूर्या आणि तिच्या आईने टोळीला छापखान्यासाठी बंगला देऊ केला होता, अशी माहिती पुढे आली. या टोळीकडून बनावट नोटांचा मोठा साठा हस्तगत होण्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या