Advertisement

Coronavirus Updates: अखेर IPL पुढे ढकलली; १५ एप्रिलपासून सुरू होणार

आयपीएलबाबत निर्णय घेण्यात आला असून, आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Coronavirus Updates: अखेर IPL पुढे ढकलली; १५ एप्रिलपासून सुरू होणार
SHARES

जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका इंडियन प्रिमियर लीगला (IPL) बसला आहे. गेले काही दिवस कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात शिरकाव केल्यानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी आयपीएल रद्द करण्यात यावी अशा सुचना  बीसीसीआयकडं (BCCI) केल्या जात होत्या. परंतु, आयपीएल रद्द केल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळं आयपीएल होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर आयपीएलबाबत निर्णय घेण्यात आला असून, आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

२९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल आता १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. करोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची (IPL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली असून, आयपीएल पुढे ढकलल्याची कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना (Team Owner) देखील देण्यात आली आहे.

जगभरातील ११० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे. भारतामध्येही ८० जणांना लागण झाल्याचं आढळलं आहे. सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचं आवाहन करण्यात येत असून, अशा वातावरणात आयपीएल भरवणं धोक्याचं असल्याचं प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल (IPL) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारनं (Central Government) बुधवारी सर्व व्हिसा १५ एप्रिल पर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक (BCCI officials Meeting) झाली व आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, अनेक राज्य सरकार आयपीएलचे सामने पुढे ढकलावेत यासाठी केंद्र सरकारला विनंती करत असताना, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आयपीएल सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली.



हेही वाचा -

CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही

एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाची परीक्षा टॅबवर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा