Advertisement

CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही

कोरोनाचा फटका हापूस आंब्याच्या निर्यातीलाही बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.

CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही
SHARES

मार्च महिना सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना उन्हाळ्याची चाहूल लागते. तसंच, उन्हाळा म्हटलं की आंब्याचा (Mango) मोसम. या मोसमात मोठ्या प्रमाणात आंब्याची विक्री होते. मात्र, यंदा जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळं सगळ्यावर पाणी सोडलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) वस्तूंचे भाव उतरल्यानंर आता कोरोनाचा फटका हापूस आंब्याच्या निर्यातीलाही बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.

आखाती देशात हवाई मार्गानं होणारी निर्यात पूर्णपणं बंद झाली आहे. त्यामुळं यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये (Mumbai Agricultural Income Market Committee) सद्यस्थितीमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यामधून प्रतिदिन ४ हजार पेट्यांची हापूसची आवक होवू लागली आहे.

मुंबईमधून आखाती देशांसह जगभर प्रतिदिन ३००ते ४०० पेट्यांची निर्यातही सुरू झाली होती. परंतु, कोरोनाची साथ देशातही पसरू लागल्यामुळं हवाई मार्गानं होणारी निर्यात बंद झाली आहे. कुवेत, कतारसह इतर देशांमध्ये हवाई मार्गानं आंबा पाठविता येत नसल्यानं त्याची बाजार समितीमध्येच विक्री करावी लागत आहे.

आंबा हंगामाच्या सुरवातीलाच कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे कोकणातील (Kokan) शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी आंबा निर्यात घटण्याची शक्यता आहे. निर्यात कमी झाल्यास देशांतर्गत भाव कोसळण्याचीही शक्यता आहे. गतवर्षी ४६ हजार ५१० टन आंबा निर्यात होवून ४०६ कोटी रूपयांची उलाढाल झाली होती.

आंबा हा सर्वांचा आवडता फळ असलून त्याची मोठी विक्री दरवर्षी होत असते. कोकण हे आंब्यासाठी महत्वाचं ठिकाणं मानलं जातं. पण यंदा कोरोनाचं सावटं आंब्यावर आल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या १५ वर

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा