Advertisement

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) चांगलेच नाराज झाले आहेत.

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले
SHARES

शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) चांगलेच नाराज झाले आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांचं काम पक्षाला दिसलं, पण आमचं काम दिसलं नाही, अशा शब्दांत खैरे यांनी आपली नाराजी उघड केली.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले औरंगाबादमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांचं पक्षाकडून पुनर्वसन केलं जाईल, असं म्हटलं जात होतं. परंतु त्यांच्या जागी चतुर्वेदी यांची निवड करून पक्षाने खैरे यांना धक्का दिला. 

हेही वाचा- राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले...

प्रियंका चतुर्वेदी विधानसभा निवडणुकीआधी १९ एप्रिल २०१९ रोजी काँग्रेसमधून (congress) शिवसेनेत (shiv sena) आल्या होत्या. काँग्रेसमध्ये त्यांनी १० वर्षे काम केलं होतं.  त्यानंतर शिवसेनेत त्यांना उपनेते पद आणि प्रवक्तेपद देण्यात आलं. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराची धुराही वाहिली होती. 

त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, पक्षाला प्रियंका चतुर्वेदी यांचं काम दिसलं, पण आमचं काम दिसलं नाही. त्या हिंदी बोलतात आणि  इंग्रजीही बोलतात. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला नाही, पण माझ्या शहराला खासदारकीची गरज होती. मला संधी मिळाली असती, तर पक्षासाठी आणखी चांगलं काम करता आलं असतं. मला अनेक ऑफर आल्या होत्या. पण इकडे-तिकडे गेलो नाही. स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेतच राहील. मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करत आहे. उद्धव ठाकरेंना वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. त्यानुसार त्यांनी चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. 

येत्या २ एप्रिल रोजी महाराष्ट्रातून राज्यसभेच्या (maharashtra rajya sabha seat) ७ जागा रिक्त होत आहे. या जागांकरीता अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ मार्च आहे. तर १८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल. या निवडणुकीत विधानसभेतील निर्वाचीत आमदार मतदान करणार आहेत. राज्य विधानसभेत एका आमदाराच्या मताचं मूल्य १०० मतांएवढं आहे. विधानसभेत २८८ उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजे सर्व आमदारांच्या एकत्रित मताचं मूल्य २८,८०० एवढं होतं. त्यानुसार राज्यसभेत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ३,६०१ मतांची गरज आहे. सध्याच्या आमदारांच्या संख्येनुसार भाजपचे ३, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येक एक उमेदवार निवडून येऊ शकतो. असं असूनही राष्ट्रवादीने आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे.   

हेही वाचा- ६ वर्षांत शरद पवारांची 'इतकी' वाढली संपत्ती

दरम्यान शरद पवार (sharad pawar) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला असून काँग्रेसने राजीव सातव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि डाॅ. भागवत कराड यांची उमेदवारी घोषित केली आहे.  


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा