Advertisement

६ वर्षांत शरद पवारांची 'इतकी' वाढली संपत्ती

शरद पवार यांनी राज्यसभेसाठी गुरूवारी उमेदवारी अर्ज (Candidate Application Form) भरला. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रात (Affidavit) त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.

६ वर्षांत शरद पवारांची 'इतकी' वाढली संपत्ती
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची संपत्ती (property) मागील ६ वर्षात ६० लाख रुपयांनी वाढली आहे. पवार यांनी राज्यसभेसाठी गुरूवारी उमेदवारी अर्ज (Candidate Application Form) भरला. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रात (Affidavit) त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. 

मुंबईत विधानभवनात शरद पवार  (sharad pawar) यांनी राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. शपथपत्रात (Affidavit) पवार यांनी आपली ३२.७३ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ कोटी रुपयांची जंगम आणि २ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्यांच्यावर १ कोटी रुपयांचं कर्जही आहे.  प्रतिभा पवार यांना 'ऍडव्हान्स डिपॉझिट' म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचंही त्यांनी शपथपत्रात नमूद केलंय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 

तसंच हिंदू अविभाजीत कुटुंब नियमाप्रमाणे, शरद पवार (sharad pawar) यांना 'ऍडव्हान्स डिपॉझिट' म्हणून नातू - अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्याकडून ५० लाख रुपये मिळाले आहेत. २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीवेळी  दाखल केलेल्या शपथपत्रात शरद पवार यांनी २० कोटी ४७ लाख ९९ हजार ९७० रुपयांची जंगम मालमत्ता आणि  ११ कोटी ६५ लाख १६ हजार २९० रूपयांची स्थावर मालमत्ता अशी एकूण ३२.१३ कोटींची संपत्ती जाहीर केली होती. 

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ७ जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठी निवडणूक होत असून  १३ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याचा करण्यासाठी शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्जांची पडताळणी १६ मार्च रोजी होणार आहे. १८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहत भाजप ३, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेत दाखल होऊ शकतील. 



हेही वाचा -

…तर कमलनाथ चमत्कार करु शकतात- शरद पवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सभा, बैठका केल्या रद्द



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा