Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सभा, बैठका केल्या रद्द

वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची (coronavirus) भिती सर्वांनीच घेतली आहे. कोरोेनाचा प्रसार वाढत असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) खबरदारीचं पाऊल उचललं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सभा, बैठका केल्या रद्द
SHARES

वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची (coronavirus) भिती सर्वांनीच घेतली आहे. कोरोेनाचा प्रसार वाढत असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) खबरदारीचं पाऊल उचललं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द केले आहेत. सध्या पक्षाकडून कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम व जाहीर सभा घेतली जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाची (coronavirus) लागण झालेले मुंबईत दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची आढावा बैठक घेऊन अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.  या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने सार्वजनिक कार्यक्रम व जाहीर सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नवाब मलीक (Nawab Malik) म्हणाले की, कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत कोणतीही जाहीर सभा वा जाहीर मेळावा आयोजित करणार नाही. याबाबत पक्षाने निर्णयच घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अन्य पक्षांनीही हे पाऊल उचलावे. 

 कोरोनाबाबत नागरिकांनी भीती बाळगू नये. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सामूहिक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतानाच खासगी रुग्णालयांतील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. 



हेही वाचा -

…तर कमलनाथ चमत्कार करु शकतात- शरद पवार

या भीतीने उद्धव ठाकरे 'मातोश्री' सोडून 'वर्षा' बंगल्यावर जाणार नाहीत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा