Advertisement

…तर कमलनाथ चमत्कार करु शकतात- शरद पवार

कमलनाथ यांच्या कर्तृत्वाबद्दल मला विश्वास आहे, त्यांची क्षमता मी जाणतो. ते चमत्कार करू शकतात

…तर कमलनाथ चमत्कार करु शकतात- शरद पवार
SHARES

कमलनाथ चमत्कार करू शकतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तृत्वाबद्दल मला विश्वास आहे, त्यांची क्षमता मी जाणतो. ते चमत्कार करू शकतात असं लोकांनाही वाटतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला दोष देता येणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे

हेही वाचाः- ‘ऑपरेशन लोटस’बाबत पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आपल्याला कमलनाथ यांच्या कतरुत्वावर विश्‍वास असून ते एखादा चमत्कार घडून सरकारला वाचवू शकतात, असं सूचक विधान केलं आहे. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्‍वास असून त्यामुळे ते एखादा चमत्कार करू शकतात. कमलनाथवर माझा भरोसा आहे. आज नाहीतर उद्या ते काय करतील हे दिसेल, असे पवार म्हणाले. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचाः -छत्रपती शिवाजी महाराज पार्क!

निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर संघटनेमध्ये लगेचच जबाबदारी द्यावी, अशी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांची इच्छा होती. अशी टोकाची भूमिका कोणी घेतल्यास पक्षाला दोष देता येणार नाही. मात्र मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात कुठला प्रयोग होऊ शकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारला त्यांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीबाबत आपण शंभऱ टक्के मार्क देऊ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारकिर्दसुद्धा उत्तमपणे सुरू आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा