Advertisement

‘ऑपरेशन लोटस’बाबत पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना त्या म्हणाल्या की

‘ऑपरेशन लोटस’बाबत पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट
SHARES

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप घडला. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी चर्चा रंगली आहे. तर ह्य मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील लवकरच ऑपरेशन लोटस होईल, असा गौप्यस्फोट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

हेही वाचाः-छत्रपती शिवाजी महाराज पार्क!

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना त्या म्हणाल्या की, ऑपरेशन हे सांगून होत नसतं. लवकरच होईल आणि नंतर सर्वांना कळणार आहेच. तसेच, राज्यात मध्यप्रदेशच्या धर्तीवर आता लवकरच ऑपरेशन लोटस यशस्वी करू, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि धनंजय मुंडे हे एका प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत. त्यांना अशा राष्ट्रीय पक्षाच्या भूमिका समजणे शक्य नाही आणि त्यांच्याही पक्षात असे ऑपरेशन अगोदर झालेले आहेत. त्यामुळे त्यांना चांगलेच माहीत आहे, असा खोचक टोलाही पंकजा यांनी धनंजय मुंडेंना लगावला. नुकतेच मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी झाले असून काँग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू होती, याला पंकजा मुंडे यांनी पुष्टी दिली.


राज्यात वेगळे काही घडणार नाही - शरद पवार

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मध्य प्रदेशसारखी राज्यात परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता फेटाळून लावली. मध्य प्रदेशात पडसाद महाराष्ट्रात स्थिती काही येणार नाही. महाराष्ट्र मला राजकीय स्थितीची जाण आहे. त्यामुळे मला वाटते येथे वेगळं काही घडेल असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशात सरकार हे गेले नाही. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्‍वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवी होता. कदाचित तिथे कमी काही झाले असावे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचाः-चव्हाणांचे ते मत ऐकले असते तर, बाबरी पडलीच नसती - शरद पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा