Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज पार्क!

मुंबईतील दादर येथील 'शिवाजी पार्क' हे मैदान आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या नावानं ओळखलं जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क!
SHARES

मुंबईतील दादर येथील 'शिवाजी पार्क' हे मैदान आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या नावानं ओळखलं जाणार आहे. गेली अनेक वर्ष या मैदानाला शिवाजी महाराज या नावानचं जगभरात ओळखलं जात होतं. परंतु, आता ९३ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नामकरणाच्या प्रस्तावास बुधवारी महापालिका सभागृहाच्या बैठकीत एकमतानं मंजुरी देण्यता आली आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात. त्याशिवाय, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचं आयोजनही या मैदानात होतं. १० मे १९२७ रोजी मैदानाला शिवाजी पार्क असं नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता.

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळं मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळं शिवाजी पार्कचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नामकरण करण्यासाठी शिवसेनेनं महापालिकेकडं पाठपुरावा केला. १० मे १९२७ रोजी महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आलेला ठराव पुन्हा फेरविचारासाठी पालिका सभागृहात सादर करण्यात आला.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपसूचना मांडून शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करण्याची मागणी केली. त्यास भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळं नामकरणाचा ठराव एकमतानं मंजूर झाल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मैदानाचा नामकरण सोहळा होणार आहे.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' ठिकाणची हवा अतिवाईट

प्लास्टिक जप्त करून पालिकेनं कमवले १० दिवसात कमवले २९ लाख



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा