Advertisement

मुंबईतील 'या' ठिकाणची हवा अतिवाईट


मुंबईतील 'या' ठिकाणची हवा अतिवाईट
SHARES

जगभरात कोरोना वायरसच्या भीतीमुळे नागरिकांनी घरीच राहाण पसंत केलं आहे. मात्र, त्यात आणखी भर म्हणजे मुंबईतील बोरीवली येथील हवेची गुणवत्ता खलावली असल्याची माहिती समोर येत आहे. बोरिवली इथं धुळवडीच्या दिवशी हवेची गुणवत्ता खालावली होती. सफर या हवामान प्रणालीनुसार, बोरिवलीसह माझगाव येथेही हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदली गेली. 

मंगळवारी धुळवडीच्या निमित्तानं विविध रंगांमध्ये रंगलेल्या मुंबईकरांना प्रदूषणाच्या त्रासाला समोर जावं लागलं. बोरिवली येथे पीएम २.५ मुळे हवेची गुणवत्ता घसरली. बोरिवलीत हवेचा दर्जा अतिवाईट होता. पीएम २.५ चा निर्देशांक ३१३ पर्यंत खालावला होता.

बोरिवलीची हवा संध्याकाळच्या सुमारास जास्त वाईट झाली. दुपारी बोरिवली येथील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २८७ होता. संध्याकाळनंतर तो घसरला. माझगाव येथेही सातत्याने हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदवली जात आहे. मालाड, चेंबूर येथील हवा संध्याकाळी वाईट नोंदली गेली. या दोन्ही ठिकाणी पीएम २.५ ची गुणवत्ता घसरल्याचे आढळले. 

अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि वरळी येथे मात्र हवेचा दर्जा मध्यम होता. भांडुप आणि कुलाबा येथे मात्र हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. सफरच्या नोंदींपेक्षा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोंद मात्र वेगळी होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणीनुसार वरळी येथील हवा समाधानकारक असल्याचे समोर आले. तर, बोरिवलीच्या हवेची गुणवत्ता मध्यम असल्याची सायं. ७ वाजता नोंद झाली.

या नोंदीनुसार बोरिवली येथे दिवसभर पीएम २.५ ची गुणवत्ता समाधानकारकच होती. दुपारी १२ नंतर पीएम १० ची गुणवत्ता घसरली. दुपारी २ नंतर ही गुणवत्ता अतिवाईट नोंदली गेली.

यंदा होलिकादहनाच्या प्रमाणात घट झालेली आढळून आली. दरवर्षी होलिकादहनानंतर प्रदूषणामध्ये वाढ जाणवते. मंगळवारी सकाळच्या वेळी वातावरण धुरकट जाणवत होते. मात्र दुपारनंतर हा प्रभाव कमी झाला आणि दृश्यमानता वाढल्याची माहिती मिळते. 

मंगळवारी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता कमी होती. त्यामुळेही कदाचित प्रदूषणात वाढ झाली असेल. मात्र होळीमुळे खूप जास्त प्रदूषण झाले नसावे असे एकंदर मंगळवारच्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवरून स्पष्ट केले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा