Advertisement

राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले...

भाजपने गुरूवारी राज्यसभेसाठी (Rajya sabha) आपल्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपचे मराठवाड्यातील नेते डॉ. भागवत कराड (bhagwat karad) यांना पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे.

राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले...
SHARES

भाजपने गुरूवारी राज्यसभेसाठी (Rajya sabha) आपल्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपचे मराठवाड्यातील नेते डॉ. भागवत कराड (bhagwat karad) यांना पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा- मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पवारांकडून कौतुक, म्हणाले...

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या (maharashtra rajya sabha seat) ७ जागा रिक्त होत आहेत. यामध्ये शरद पवार यांच्यासोबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, शिवसेनेचे खा. राजकुमार धूत, भाजपचे खा. अमर साबळे, भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष खा. संजय काकडे, राष्ट्रवादीचे खा. माजिद मेनन यांचा समावेश आहे. या सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. या ७ जागांपैकी २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असून शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी १ जागा लढवत आहे.

भाजपने बुधवारी रामदास आठवले (ramdas athawale ) यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा केली. यामुळे संजय काकडे आणि अमर साबळे यांचा पत्ता कापल्याचं म्हटलं जात होतं. तिसऱ्या जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री हंसराज अहिर यांच्याही नावांची चर्चा होती. त्यातही पक्षाच्या राज्य कार्यकारणीने खडसेंच्या नावाची संसदीय बोर्डाकडे शिफारस केल्याने ते या शर्यतीत पुढं असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु पक्षाने डाॅ. कराड यांना उमेदवारी देत सगळ्यांनाच धक्का दिला. 

हेही वाचा- भाजपकडून आठवले, उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे (eknath khadse) म्हणाले, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती हे खरं आहे. मात्र, मलाच तशी अपेक्षा नव्हती. पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्याच्या राजकारणात मला जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळं माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती.'

अशा रितीने नाराज खडसेंना पुन्हा एकदा पक्षाकडून डावलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा