Advertisement

मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पवारांकडून कौतुक, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp president sharad pawar) यांनी मात्र या संकल्पनेचं कौतुक केलं आहे.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पवारांकडून कौतुक, म्हणाले...
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi government) वचक ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची (Shadow cabinet) नुकतीच घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस (congress) तसंच शिवसेनेकडून (shiv sena) या शॅडो कॅबिनेटवर टीका करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp president sharad pawar) यांनी मात्र या संकल्पनेचं कौतुक केलं आहे. 

शरद पवार यांनी बुधवारी विधानसभेत येऊन राज्यसभा उमेदवारीचा (rajya sabha candidate form) अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब विखे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे इ. नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री फौजियाा खान देखील उपस्थित होत्या. परंतु त्या गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ मार्च आहे. 

हेही वाचा- सरकारच्या मेगाभरतीला रोहित पवारांचा आक्षेप

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या (maharashtra vidhan sabha) ७ जागा रिक्त होत आहेत. यामध्ये शरद पवार यांच्यासोबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, शिवसेनेचे खा. राजकुमार धूत, भाजपचे खा. अमर साबळे, भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष खा. संजय काकडे, राष्ट्रवादीचे खा. माजिद मेनन यांचा समावेश आहे. या सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. या ७ जागांपैकी २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असून शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी १ जागा लढवत आहे.

सातवी जागा लढल्यास त्यात विजय होऊ शकतो असं सांगत या जागेवर राष्ट्रवादीकडून फौजिया खान (ncp rajya sabha candidate fauzia khan) यांना उमेदवारी देण्यात येत आहे. परंतु काँग्रेसने तिथं आपला उमेदवार असावा यासाठी आग्रह धरला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असून प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान ३७ मतांची आवश्यकता आहे.   

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मध्य प्रदेशमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी उत्तम काम करत असून इथं मध्य प्रदेशसारखी परिस्थिती ओढावणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार असूनही या सरकारने १०० दिवस पूर्ण केल्यामुळे या सरकारला १०० टक्के गुण देता येतील.

हेही वाचा- मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही- संजय राऊत

यानंतर पत्रकारांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर (mns shadow cabinet) प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले, सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेट तयार केली असेल तर त्याचं स्वागतच आहे. त्यांनी चांगलं काही तरी केलं पाहिजे. लोकांसमोर चांगलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा