Advertisement

मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही- संजय राऊत

मध्य प्रदेशमधील (madhya pradesh congress government) व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी तेथील राजकीय अस्थिरतेवर भाष्य केलं आहे.

मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही- संजय राऊत
SHARES

मध्य प्रदेशमधील (madhya pradesh congress government) व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी तेथील राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना भाजपला टोला हाणला आहे. 

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांचे विश्वासू आणि मध्य प्रदेशमधील वजनदार नेते ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी काँग्रेसला (INC) सोडचिठ्ठी देत बुधवारी दुपारी भाजपात (bjp) प्रवेश केला. त्याआधी ज्योतिरादित्य यांच्या २० हून अधिक समर्थक आमदारांनी आमदारकीचे राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अस्थिर झालं आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजपचं ‘आॅपरेशन लोटस’ (operation lotus) यशस्वी होईल का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी संजय राऊत (sanjay raut) यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करुन पाहिला. मात्र १०० दिवसांपूर्वी हे आॅपरेशन फसलेलं आहे. कारण महाराष्ट्राची पाॅवर वेगळी आहे. महाविकास आघाडीने बायपास आॅपरेशन करून महाराष्ट्राला वाचवलं आहे.” असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा