Advertisement

सरकारच्या मेगाभरतीला रोहित पवारांचा आक्षेप

येत्या २० एप्रिलपासून मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या मेगाभरतीसाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून महापरीक्षा पोर्टल ऐवजी ही परीक्षा खासगी एजन्सीमार्फत घेण्यात येणार आहे.

सरकारच्या मेगाभरतीला रोहित पवारांचा आक्षेप
SHARES

फडणवीस सरकारने (fadnavis government) मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मेगाभरतीला (mega recruitment) अखेर महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi government) काळात मुहूर्त मिळाला आहे. येत्या २० एप्रिलपासून मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या मेगाभरतीसाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून महापरीक्षा पोर्टल ऐवजी ही परीक्षा खासगी एजन्सीमार्फत घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Ncp mla rohit pawar) यांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा- मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही- संजय राऊत

राज्यात शासकीय कर्मचार्‍यांची मोठी कमतरता निर्माण झाली असून सद्यस्थितीत राज्यात तब्बल २ लाख शासकीय पदे रिक्त आहेत. गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास अशा महत्वाच्या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्त जागा आहेत. रिक्त पदांपैकी १ लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणी देखील पूर्ण झाली आहे. ही पदे भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात करण्याचे निर्देश राज्य सरकारने महाआयटीला (mahait portal) दिले आहेत. त्यासाठीही निविदा २ दिवसांत प्रसिद्ध होईल. राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार त्यात महाभरतीसंबंधी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 

या भरतीसंदर्भात रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्विटरवरुन आक्षेप नोंदवला आहे. राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये?'', असं म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.

हेही वाचा- मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, जितेंद्र आव्हाडांचा नाईकांना टोमणा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा