Advertisement

मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, जितेंद्र आव्हाडांचा नाईकांना टोमणा

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (ncp housing minister jitendra awhad) तसंच नवी मुंबईतील भाजप नेते​ गणेश नाईक​​​यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेलं शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलं आहे.

मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, जितेंद्र आव्हाडांचा नाईकांना टोमणा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (ncp housing minister jitendra awhad) तसंच नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक (navi mumbai bjp leader ganesh naik) यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेलं शाब्दिक युद्ध चांगलंच रंगात आलं आहे. नाईक यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, अशी बोचरी टीका आव्हाड यांनी केली आहे. 

हेही वाचा- तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक… आव्हाडांना खुलं आव्हान

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (avi mumbai municipal corporation election) पार्श्वभूमीवर कोपरखैरणे इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना जितेंद्र आव्हाड (ncp housing minister jitendra awhad) यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. शिवसेनेत असताना आधी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आणि नंतर राष्ट्रवादीत गेल्यावर शरद पवारांशी नाईकांनी गद्दारी केली. तसंच नाईक हे खंडणीखोर असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला होता. 

त्याला गणेश नाईक यांनी, “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाईलने प्रतिउत्तर दिलं होतं.

त्यानंतर मी एकदा नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथकल्लीच सुरु केली आहे. अजून शंभरवेळा मी जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो  आणि स्वत: च्या आवाजात मारतो, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा- हा डोक्यावर पडला आहे काय? जितेंद्र आव्हाड अभिनेते शरद पोंक्षेवर चिडले

तसंच नवी मुंबईतील आग्र्यांची घरं तोडली जात होती तेव्हा तुम्ही काय करत होतात? वाढलेली गावठाणं सुरक्षित राहावीत यासाठी काय केलं? नव्या सीमा आखल्या पाहिजेत ते काही नाही केलं? असा सवाल देखील विचारला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा