Advertisement

हा डोक्यावर पडला आहे काय? जितेंद्र आव्हाड अभिनेते शरद पोंक्षेवर चिडले

हा डोक्यावर पडला आहे काय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी अभिनेते शरद पोंक्षे (Actor sharad ponkshe) यांच्यावर टीका केली आहे.

हा डोक्यावर पडला आहे काय? जितेंद्र आव्हाड अभिनेते शरद पोंक्षेवर चिडले
SHARES

हा डोक्यावर पडला आहे काय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी अभिनेते शरद पोंक्षे (Actor sharad ponkshe) यांच्यावर टीका केली आहे. अस्पृश्यता निवारण्याच्या कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा विनायक दामोदर सावरकरांचं (veer savarkar) योगदान मोठं असल्याचं वक्तव्य पोंक्षे यांनी केलं होतं. 

हेही वाचा- दिल्ली हिंसाचाराला केंद्र सरकारच जबाबदार, शरद पवारांचा थेट आरोप

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी हे वक्तव्य केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr b.r.ambedkar) आणि महात्मा फुले (mahatma phule) हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात ते दोघेही लढले. मात्र अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसलेला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे,” असा दावा पोंक्षे (Actor sharad ponkshe) यांनी आपल्या भाषणातून केला होता.

पोंक्षे यांच्या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटलं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (ncp leader amol mitkari) यांनी ट्विट करत, .पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो,” असा टीका केली.

हेही वाचा- हे सरकार शंभर टक्के मराठाविरोधी, नितेश राणेंची सरकारवर टीका

त्या पाठोपाठ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी देखील ट्विटरवरून पोंक्षे यांना, अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे.. डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही. असं म्हणत सुनावलं.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा