दिल्लीतील हिंसाचाराला (Delhi violence) पूर्णपणे केंद्र सरकारच (bjp government, ) जबाबदार असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी केला. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर दिल्लीतील हिंसाचारावरून टीका केली.
हेही वाचा- सध्या माझा पक्ष बॅचलर, युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर
केंद्राची राज्य सरकारांबाबतची अधिकाराची सीमा मर्यादित आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा विचार राज्य सरकारकडे आहे. दिल्ली राज्याला मात्र कायदा सुव्यवस्थेचा अधिकार घटनेने दिलेला नाही. तो केंद्र सरकारकडे असल्यामुळे दिल्लीत जे घडतंय त्याची १०० टक्के जबाबदारी केंद्र सरकारवर पडते.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 1, 2020
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह ४ राज्यांतील सत्ता गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (home minister amit shah) आणि भाजप नेत्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणारा प्रचार केला. पंतप्रधानांचं या काळातलं भाषण ऐकल्यावर त्यातून त्याची प्रचिती येते. देशाचं नेतृत्व करणारी व्यक्तीच जर धार्माच्या आधारे समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य करत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. असं असूनही दिल्लीकरांनी विधानसभा (delhi vidhan sabha election) निवडणुकीत भाजपला (bjp) नाकारल्याने त्यांना सपशेल पराभवाचा सामना करावा लागला, असं पवार म्हणाले.
राज्यकर्ते चुकीचे वागत धर्म, जात, भाषेचा आधार घेऊन समाजात फूट पडायला लागले ही स्थिती असेल तर तिला सामोरं जाऊन, ही प्रवृत्ती या देशात चालू देणार नाही, ही भावना जनमानसात वाढवण्याच्या कामी मजबुतीने एकत्रित येणाऱ्या राजकीय शक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रक्रमाने उभा राहील. pic.twitter.com/AlzNc2GoOU
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 1, 2020
मुंबईप्रमाणेच दिल्ली देखील काॅस्मोपाॅलिटन शहर आहे. भाजपला (bjp) इथं अपेक्षित कामगिरी करता न आल्याच्या रागातून या शहराला आग लावली जात आहे. दिल्लीतील वातावरण जाणीवपूर्वक खराब करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (us president donald trump) भारतात आले असताना एका विशिष्ट समाजाच्या लोकांना लक्ष्य केलं जात होतं. विशिष्ट धर्मियांच्या शिक्षणसंस्थांमध्ये घुसून नुकसान करण्यात आलं. दिल्ली उद्धवस्त करण्याचं काम झालं. दिल्लीतील दंगलीची (Delhi violence) १०० टक्के जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच आहे. तसंच ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.
हेही वाचा- हे सरकार शंभर टक्के मराठाविरोधी, नितेश राणेंची सरकारवर टीका