Advertisement

तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक… आव्हाडांना खुलं आव्हान

भाजपवासी झालेले नवी मुंबईतील नेते गणेश नाईक (Bjp leader ganesh naik) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp housing minister jitendra awhad) यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे.

तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक… आव्हाडांना खुलं आव्हान
SHARES

भाजपवासी झालेले नवी मुंबईतील नेते गणेश नाईक (Bjp leader ganesh naik) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp housing minister jitendra awhad) यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. नवी मुंबईतील भ्रष्टाचार आणि खंडणी गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्याला नाईक यांनी “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- भाजपचे किती आमदार आमच्या संपर्कात हे त्यांना ठाऊक नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (avi mumbai municipal corporation election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुकलं आहे. त्यानिमित्ताने कोपरखैरणे इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना जितेंद्र आव्हाड (ncp housing minister jitendra awhad) यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. नवी मुंबईतील रेती उद्योग आणि कारखान्यांकडून खंडणी वसूल करत गणेश नाईक स्वत: मोठे झाले आणि इतरांना मोठं होऊ दिलं नाही. गणेश नाईकांच्या रक्तातच गद्दारी आहे. १९९० साली शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांनी त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळवून दिला. पण १९९९ साली नाईकांनी त्यांच्याशी गद्दारी केली. त्यानंतर २०१४ पर्यंत शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी त्यांना सांभाळलं, प्रगतीच्या वाटा मोकळ्या करुन दिल्या. २०१४ मध्येच त्यांच्या मनात गद्दारीचा विचार आला हाेता. जो २०१९ मध्ये जुळून आला. 

राजकीय महत्त्वकांक्षेपोटी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचाही बळी दिला. राष्ट्रवादीत असताना त्यांनी ठाण्यात पक्ष संपवला. मलाही संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. 

आव्हाड यांच्या आरोपांना गणेश नाईक (ganesh naik) यांनी उत्तर दिलं आहे. कोण म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा. “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक.”

हेही वाचा- मनसेचे शॅडो कॅबिनेट तयार?

शिवाय मी संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितलं होतं, हे कार्यकर्त्यांना माहीन आहे, असं म्हणत त्यांनी संदीप नाईक यांना भाजपमध्ये पाठवण्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा