Advertisement

भाजपचे किती आमदार आमच्या संपर्कात हे त्यांना ठाऊक नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

कदाचित त्यांना याची कल्पना नसेल की त्यांचे किती आमदार आमच्या संपर्कात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी भाजपच्या कृतीवर ताशेरे ओढले.

भाजपचे किती आमदार आमच्या संपर्कात हे त्यांना ठाऊक नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
SHARES

सत्ता मिळवण्यासाठी भाजप (bjp) काय उत्पात घालेल याचा काही नेम नाही. परंतु महाराष्ट्रात आम्ही १६२ आमदारांचा आकडा दाखवून दिलाय. वाटलंच तर पुन्हा १७१ आमदार दाखवून देऊ. कदाचित त्यांना याची कल्पना नसेल की त्यांचे किती आमदार आमच्या संपर्कात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी भाजपच्या कृतीवर ताशेरे ओढले. 

हेही वाचा- हे सरकार नक्की चालवतंय कोण? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मध्य प्रदेशमधील (madhya pradesh congress government) काँग्रेसचे आमदार फोडून तिथं सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी फुटीर आमदारांना वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काँग्रेसच्या कमलनाथ सरकारकडे बहुमतापेक्षा ४ आमदार जास्त (१२०) आहेत. अशा स्थितीत काँग्रेसचे ५ आमदार फुटल्यास तेथील सरकार कोसळेल. त्यावर आता महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

यासंदर्भात मत व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) म्हणाले, राजकीय संस्कृतीची पातळी किती घसरत चालली आहे. याचं प्रदर्शन भाजप करत आहे. भाजपा (bjp) सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि असा चेहरा भाजप स्वत:च बनवत आहे. आमदारांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न भाजप करते. मात्र, भाजपच्या या कृत्यांना जनता किती सहन करणार?  देशात कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. दंगे चालू आहेत. सीएए, एनआरसीमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे आणि असं असताना केवळ आपण सत्तेशिवाय राहू शकणार नाही म्हणून पाहिजे त्या स्तराला जायचं, हा भाजपाचा लाजिरवाणा प्रयत्न दिसून येतोय.

हेही वाचा- मुंबई महानगर परिसरात सरकार बांधणार ३० हजार घरे

ते पुढं म्हणाले, भाजपा कधी काय करेल, केंद्रीय सत्तेच्या जोरावर काय उत्पात घालेल, याबद्दल काहीही सांगता येत नाही. महाराष्ट्रात एकदा आम्ही १६२ दाखवून दिलेलं आहे, परत एकदा १७१ दाखवू. कदाचित त्यांना याची कल्पना नसेल, की त्यांचे किती आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं सांगून त्यांनी भाजपलाही इशारा दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा