Advertisement

मुंबई महानगर परिसरात सरकार बांधणार ३० हजार घरे

मुंबई महानगर परिसरात (MMR) राहणाऱ्या रहिवाशांना स्वस्त दरात परवडणाऱ्या घरांची (affordable housing) मोठी गरज आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे १ मे २०२० पर्यंत ३० हजार घरे बांधण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुंबई महानगर परिसरात सरकार बांधणार ३० हजार घरे
SHARES

मुंबई महानगर परिसरात (MMR) राहणाऱ्या रहिवाशांना स्वस्त दरात परवडणाऱ्या घरांची (affordable housing) मोठी गरज आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे १ मे २०२० पर्यंत ३० हजार घरे बांधण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी विधानसभेत दिली. मुंबई महानगरक्षेत्रातील घरे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, म्हाडाची घरे यावरील चर्चेला उत्तर देताना आव्हाड बोलत होते. 

हेही वाचा- उपमुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून १०० युनिटपर्यंत मोफत वीज?

जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) म्हणाले, मुंबईत सद्यस्थितीत १ लाख ५६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. बाजारातील मंदी यासोबत या घरांच्या अवाढव्य किंमती हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. यातून हेच स्पष्ट होतं की मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांची (affordable housing) मोठी गरज आहे. मुंबई भोवतालच्या परिसरात ५ लाख नवीन घरं बांधता येऊ शकतात. ही घरे परवडणारी असल्यास सर्वसामान्यांची घरांची गरज भागण्यासोबतच बांधकाम क्षेत्रातील मंदीही दूर होऊ शकते. त्यासाठी प्रधानमंत्री आवास (PMAY) योजनेतील गृहनिर्माण योजनांवरील बंधने दूर करण्याचा शासन विचार करीत आहे. माझ्यावर बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप झाला तरी चालेल. पण मुंबई व परिसरातील गृहनिर्माण क्षेत्राचं रुप पालटण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि सामान्य माणूस हा त्याचा केंद्रबिंदू असेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.   

झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांना (SRA) गती देण्यासाठी परिशिष्ट-२ तयार करण्याचे अधिकार एसआरएला देण्यात येत असून म्हाडा (MHADA), शासकीय जमीन आणि एसआरएचे सर्व परिशिष्ट एकाच छताखाली तयार करण्यात येतील. एसआरएमध्येच ९० दिवसांत लाभार्थ्यांची यादी तयार होईल. लाभार्थ्यांना विशिष्ट परिस्थितीत घरे विकता येतील, असं धोरण बनवण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांची घरे ३० दिवसांत दिली नाहीत तर बांधकाम व्यावसायिकाला फौजदारी कारवाईला सामोरे जावं लागेल. भेंडी बाजार पुनर्विकासच्या (bhendi bazar redevelopment project) धर्तीवर कामाठीपुऱ्याचाही विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मोतीलाल नगरसाठी एकात्मिक विकासाच्या संकल्पनेवर निविदा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- म्हाडा बांधणार ३ वर्षात ५ लाख घरं - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्राच्या स्थापनेला ६० वर्षे होत असल्याचं औचित्य साधत १ मे २०२० पर्यंत सर्वसामान्यांसाठी ३० हजार घरांची निर्मिती करणारे प्रकल्प सुरू होतील व पुढच्या २ वर्षांत ते पूर्ण केले जातील, अशी घोषणा आव्हाड यांनी केली. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी महामुंबई परिसरात २५ हजार एकरपेक्षा अधिक जमीन घेण्यात आली होती. या जमिनीचा वापर सर्वसामान्यांच्या घरांसाठी व्हावा यासाठी तरतूद केल्याबद्दल आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा