Advertisement

म्हाडा बांधणार ३ वर्षात ५ लाख घरं - जितेंद्र आव्हाड

आगामी ३ वर्षात म्हाडा (mhada) ५ लाख घरं (home) बांधणार आहे. या घरांपैकी ५० हजार घरं पोलीस (police) आणि चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितलं आहे.

म्हाडा बांधणार ३ वर्षात ५ लाख घरं - जितेंद्र आव्हाड
SHARES

आगामी ३ वर्षात म्हाडा (mhada) ५ लाख घरं (home) बांधणार आहे. या घरांपैकी ५० हजार घरं पोलीस (police) आणि  चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितलं आहे. ठाणे येथे शासकीय जमिनीवर सर्वसमावेशक प्रकल्प राबविण्याबाबत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आव्हाड यांनी ही माहिती दिली. या वेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, म्हाडा कोकण मंडळाचे मुख्याधिकारी माधव कुसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, सरकारकडं सध्या १० हजार घरं आहेत.  पोलिसांना आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना या घरांपैकी १० टक्के घरे देण्यात येणार आहेत. पोलिसांना १ हजार घरं आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १ हजार घरं (home) यामध्ये मिळतील. या घरांसाठी येत्या दोन महिन्यात लाॅटरी निघेल.  गरिबांसाठी परवडणारी घरे सरकारसाठी वेगळी आणि विकासकासाठी वेगळी अशी न बांधता एकत्रितच बांधली जाणार आहेत. या घरांची एकत्रित लॉटरी काढण्यात येईल.

कळवा येथे ७२ एकर, उत्तर शीव व मोघरपाडा येथे सुमारे शंभर एकर जागेवर नवीन गृहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही आव्हाड यांनी यावेळी दिली.



हेही वाचा -

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा २५ वा टप्पा पूर्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा