Advertisement

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

म्हाडा (MHADA) च्या कोकण मंडळाकडून (Konkan Circle) घरांच्या लॉटरीची जाहिरात (Advertisement) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे. या लाॅटरी (Lottery) मध्ये ९१४० घरं (home) असणार आहेत.

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात
SHARES

म्हाडा (MHADA) च्या कोकण मंडळाकडून (Konkan Circle) घरांच्या लॉटरीची जाहिरात (Advertisement) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे. या लाॅटरी (Lottery) मध्ये ९१४० घरं (home) असणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा), खोणी, शिरढोण आदी ठिकाणी ही घरे आहेत. या लॉटरीमधील घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. 

म्हाडाला (MHADA) खासगी विकासकांकडून २० टक्के घरं मिळाली आहेत. या घरांची किंमत ठरविण्याचे काम सध्या म्हाडामार्फत पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या घरांसाठी जाहिराती (Advertisement) काढण्यात येणार आहे. या लाॅटरीत (Lottery) ठाणे येथे १००, नवी मुंबई येथे ४०, कल्याणमधील पलावा येथे विकासकांकडून मिळालेली २० टक्के घरे (२००० घरे) असतील, तर म्हाडाच्या विविध प्रकल्पांतील ६०००, गेल्या लॉटरीतील शिल्लक असलेली १००० अशा एकूण ९,१४० घरांचा समावेश आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. 

म्हाडा  (MHADA) च्या मुंबई मंडळाकडून मुंबई (mumbai) मध्ये या वर्षी घरे (home) उपलब्ध होणार नाहीत. मुंबईकरांना २०२२-२०२३ पर्यंत घरांसाठी वाट पाहावी लागणार आहे. सर्वत्र सात ते आठ हजार घरांचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ही घरे सोडतीत घेण्यास म्हाडा तयार नसल्याचं समजतं. कोकण मंडळाकडून मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होणार असल्याने या लॉटरीला (Lottery) चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

आयएनएस विराटच्या विक्रीचा लिलाव पुन्हा रखडला

कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा