दिल्लीच्या (delhi) जंतर-मंतर (Jantar Mantar) मैदानावर गेल्या काही दिवसांपासून कॉकरोज जनता पार्टीचे (Cockroach Janata Party) आंदोलन सुरू आहे.
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. त्यासाठी संसदेच्या दिशेने निघालेल्या आणि जंतर-मंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) लाठीमार केला.
यात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील राजकारणातूनही यावर तीव्र आणि परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना थेट 'आतंकवादी' संबोधून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. CJP आंदोलकांचा सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी थेट आतंकवादी असा उल्लेख केला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "पेपरफुटीमुळे गोंधळ सुरु आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे. दोषींना पकडले गेले आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरु आहे. दोषींना सोडणार नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे."
"नीट उत्तीर्ण झाले ते ॲडमिशनसाठी धावपळ करत आहे. मात्र ज्यांचा संबंध नाही ते राजीनाम्याची मागणी करत आहे."
"धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही. प्रकरण लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले. मात्र इंडिया आघाडी, मविआला केंद्र आणि राज्यातले सरकार आहे त्यांच्या विरोधात वातावरण तयार करणे, सातत्याने खोटे बोलत राहाणे ही सवय झाली आहे."
"इंडिया आघाडी, मविआ आंतकवादासारखी परिस्थिती निर्माण करु पाहात आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने मूळीच घेऊ नये. केंद्रात नरेंद्र, राज्यात (maharashtra) देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र. या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावे. या आंतकवाद्यांना हे सहन होत नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
