Advertisement

मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा २५ वा टप्पा पूर्ण

मुंबईतील कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गिका असलेल्या मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचा २५ वा टप्पा बुधवारी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला.

मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा २५ वा टप्पा पूर्ण
SHARES

मुंबईतील कुलाबा ते सीप्झ (Colaba to seepz) या संपूर्ण भुयारी मार्गिका असलेल्या मेट्रो ३ च्या (Metro-3) भुयारीकरणाचा २५ वा टप्पा बुधवारी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Tourism and Environment Minister Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला. मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानक (Mumbai Central to Worli Station) या तिसऱ्या पॅकेजमधील हा पहिलाच टप्पा आहे. मेट्रो मार्गिकेपैकी ७८ टक्के भुयारीकरण पूर्ण झालं आहे.

मेट्रो ३ ची मार्गिका एकूण ७ पॅकेजमध्ये विभागली आहे. मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानक हे सर्वाधिक लांबीचे पॅकेज आहे. या पॅकेज अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझिअम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेजमधील हे पहिलेच भुयारीकरण आहे.  पॅकेज तीनच्या भुयारीकरणासाठी ‘तानसा १’ हे भुयार खोदणाऱ्या यंत्राचा (टीबीएम) वापर करण्यात आला आहे. सायन्स म्युझिअमच्या उत्तरेस २७ सप्टेंबर २०१८ रोजी हे ‘टीबीएम’ (TBM) उतरवण्यात आलं होतं. तब्बल ४९० दिवसांनी ते बुधवारी वरळी स्थानकापर्यंत २०७३ मीटर भुयारीकरण पूर्ण करून बाहेर आलं. या भुयारीकरणासाठी १३८१ सेगमेन्ट रिंग्जचा वापर करण्यात आला.

यावेळी वरळीचे आमदार आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यावेळी उपस्थित होते. 'मेट्रो ३ चे (Metro-3 Work) काम ऐतिहासिक असून या प्रकल्पावर (Project) काम करणाऱ्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी येथे आलो आहे. मेट्रो ३ चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आतापर्यंत भुयारीकरणाचे २५ टप्पे पूर्ण झाले आहेत. या वर्षांत उर्वरित ७ टप्पे पूर्ण होणं अपेक्षित आहे. भुयारीकरणासाठी सध्या १७ टीबीएम कार्यरत आहेत. ही यंत्रे उतरवण्यासाठी मार्गिकेवर ८ ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) खोदण्यात आले आहेत.हेही वाचा -

ट्रकच्या धडकेनं कोसळला पुलाचा सांगाडा, २ जण गंभीर जखमी

ऑनलाईन काढता येणार बेस्ट बसची तिकीटRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा