रेल्वे (Railway) प्रवासासाठी प्रवाशांना स्थानकातील (Station) तिकीट (Ticket) खिडकीवरील मोठ्या रांगेत उभं राहून तिकीट काढावं लागतं. त्यामुळं प्रवाशांचा अधिक वेळ खर्च होतो. त्यामुळं प्रवाशांचा हा त्रास लक्षात घेत रेल्वे प्रशासनानं मोबाईल तिकीटींग यंत्रणा (Mobile Ticket System) सुरू केली. रेल्वेप्रमाणं आता बेस्टच्या (BEST) प्रवाशांनाही ऑनलाईन मोबाईल तिकीट (Online Mobile Ticket) काढता येणार आहे. मोबाइल तिकिटिंग यंत्रणा अधिक सक्षम व सुकर करण्यासाठी डिजिटल पेमेंट अॅपचे (Digital Payment app) अधिक पर्याय बेस्ट उपक्रमाकडून उपलब्ध केलं जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव (Proposal) बेस्टनं तयार केला असून, तो लवकरच बेस्ट समितीसमोर (Best Committee) मंजुरीसाठी येणार आहे.
हेही वाचा - मुंबईकर रोहित शर्मानं घातली 'या' नव्या विक्रमाला गवसणी
सध्या बेस्ट प्रवाशांना तिकीट (Ticket) उपलब्ध करण्यासाठी वाहकांकडे ईटीआयएम मशीन उपलब्ध करण्यात आलं आहे. याबाबत रिडलर कंपनीकडून (Ridler Company) ट्रायमॅक्स कराराच्या कालावधीमध्ये मोबाइल तिकिटिंग बसपास (Mobile Ticket bus pass) देणं आणि त्याबाबतचा पुनर्भरणा करणं याकरिता सर्व बसमार्गावरील प्रवासी भाडे आधारित अॅप यापूर्वीच विकसित करण्यात आले आहेत.
हेही वाचा - कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार
मोबाइल
तिकिटिंगला (Mobile
Tickets) साहाय्य
पुरवण्यासाठी मोबाइल अॅपद्वारे
प्रत्यक्ष पास देण्यासाठी
आणि मोबाइल पाससाठी अॅप
कार्यरत आहे.
मोबाइल
तिकिटिंग यंत्रणा अधिक सक्षम
करण्याचे विचाराधीन आहे.
त्यामुळं
पेटीएम,
गुगल
पे,
मोबविक
इत्यादीसारख्या अन्य डिजिटल
पेमेंट अॅप्लिकेशनचा पर्याय
बेस्टकडून देण्यात येणार
आहे.
याच्या
माध्यमातूनन
प्रवाशांना क्रेडिट व डेबिट
कार्ड,
नेट
बँकिंग आणि प्रीपेड कार्डद्वारे
तिकिटांचे पैसे अदा करता येणार
आहेत.
गतवर्षी बेस्ट प्रशासनानं प्रवाशांची कमी झालेली संख्या भरून काढण्यासाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच, बेस्ट तिकीट दरांतही कपात केली. त्यानुसार, साध्या बससाठी ५ रुपये व एसी बससाठी ६ रुपये असे दर आकारण्यात आले आहेत. तिकीट दरांत कमी केल्यानं बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
हेही वाचा -
इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य
मराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार