देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्याबद्दल गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असल्याचे आव्हाड बीड (Beed) येथील संविधान महासभेत म्हणाले. याबाबत मित्रपक्ष काँग्रेसकडून अद्याप कुठलिही प्रतिक्रिया आली नसली. तरी आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः-आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट
महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर हे तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टिका विरोधांकडून वारंवार केली जात असताना. एका मागोमाग एक तिन्ही पक्षाकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबतीत विधान करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. इंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते. मात्र, अहमदाबाद, पाटणा येथील काही विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवली होती. यानंतर जयप्रकाश यांनी अंदोलन पुकारले होते. आताही देशात तशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आव्हाड म्हणाले.
हेही वाचाः-वाहतूककोंडीत मुंबई जगात चौथ्या स्थानी
जेएनयू, जामिया, जादवपूर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ते थेट सरकारला आव्हान देत आहेत. आता मात्र, त्यांची संख्या कमी आहे. मात्र, यातूनच नवे नेते समोर येतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. या पूर्वी इंदिरा गांधींना अनेकदा कुख्यात गुंड करीम लाला भेटण्यासाठी येत असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
हेही वाचाः-आजपासून धावणार मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल