Advertisement

आजपासून धावणार मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल

मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना गुरूवारपासून गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.

आजपासून धावणार मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल
SHARES

मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना गुरूवारपासून गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. बहुप्रतिक्षित असलेली मध्य रेल्वेची एसी लोकल (AC Local) गुरूवारपासून धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर पहिली एसी लोकल धावणार आहे. त्यामुळं ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना (Passengers) मोठा दिलासा मिळणार आहे.

३१ जानेवारी म्हणजे शुक्रवारपासून ही एसी लोकल (AC Local) नियमितपणे धावणार आहे. या एसी लोकलच्या दिवसाला १६ फेऱ्या होणार आहेत. तसंच, मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल चालवण्याचे सारथ्य महिला मोटरमनकडं (Women motorman) देण्यात आलं आहे. मनीषा म्हस्के असं या महिला मोटरमनचं नाव असून, मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल मनीषा म्हस्के चालविणार आहेत.

हेही वाचा - कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

पनवेल स्थानकातून (Panvel Station) दुपारी अडीचच्या सुमारास ठाण्यासाठी एसी लोकल चालवण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा ठाणे ते नेरुळ (Thana to Nerul) स्थानकापर्यंत नेऊन पुढे कारशेडमध्ये (Car Shade) रवाना करण्यात येणार आहे. ठाणे ते पनवेल (Thana to Panvel), ठाणे ते वाशी (Thana to Vashi), ठाणे ते नेरुळ अशा १६ फेऱ्या अप व डाऊन मार्गावर होणार आहेत.

हेही वाचा - SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ

मध्य रेल्वेला एकूण ६ वातानुकूलित लोकल दाखल होणार होत्या. यातील पहिली लोकल (Local) ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर वर्षभरात दुसरी लोकल सीएसएमटी ते पनवेल आणि उर्वरित दोन लोकल सीएसएमटी (CSMT) ते कल्याण (Kalyan) दरम्यान चालवल्या जाणार आहे. तसंच, एक लोकल ताफ्यात अतिरिक्त ठेवण्यात येणार आहे.

एसी लोकलच्या उद्घाटनानंतर गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते विविध सुविधांचं लोकार्पणही होणार आहे. त्यात वांद्रे स्थानकातील पादचारी पुलाचं उद्घाटन, तसंच विलेपार्ले, अंधेरी, वसई रोड, नालासोपारा, मुंबई सेन्ट्रल, अंधेरी, ग्राण्ट रोड, गोरेगाव स्थानकातील पादचारी पूल, जोगेश्वरी स्थानकातील पादचारी पुलाचा करण्यात आलेला विस्तार या सुविधांचा समावेश आहे.



हेही वाचा -

आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट

आरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा