Advertisement

आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट

राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका, असा इशारा आयआयटी मुंबई (iit bombay)ने विद्यार्थ्यांना दिला आहे. यासाठी बुधवारी कॅम्पससाठी (powai campus) एक नियमावलीच (rule) जाहीर करण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट
SHARES

राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका, असा इशारा आयआयटी मुंबई (iit bombay)ने विद्यार्थ्यांना दिला आहे. यासाठी बुधवारी कॅम्पससाठी (powai campus) एक नियमावलीच (rule) जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठा (AMU) त झालेल्या वादानंतर आयआयटी मुंबईने ही खबरदारी घेतली आहे.

गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने आयआयटी मुंबई (iit bombay) च्या संचालकांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात आयआयटी कॅम्पसमध्ये राजकीय विधान करणाऱ्यांवर टीका केली होती. या पत्रानंतर ही नियमावली जारी करण्यात आली आहे. स्टुडंट्स अफेअर्स असोसिएटचे डीन प्रोफेसर जाॅर्ज मॅथ्यू यांनी ही हाॅस्टेलसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत एकूण १५ नियम आहेत. 

हेही वाचा- आरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे

या नियमावलीतील नियम १० नुसार हॉस्टेलमध्ये (iit bombay powai campus) राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये भाग घेऊ नये तसंच कॅम्पसमध्ये परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर अथवा पॅम्प्लेट वाटले जाऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कॅम्पसमधील समाजकंटकांवर कारवाई करण्याची पूर्ण सूट सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. या नियमावलीत 'अँटी नॅशनल' (anti national) शब्दाचा वापर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे राजकीय विचार कॅम्पसच्या बाहेर व्यक्त करावेत, असं आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशीष चौधरी यांनी म्हटलं होतं. त्यावर विद्यार्थ्यांच्या एका गटाने तब्बल ३ हजार पानी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा