Advertisement

मराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार

मराठी शाळेत (Marathi School) शिक्षण (education) झाल्यामुळे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नोकरी (job) नाकारल्याचा संतप्त प्रकार समोर आला आहे.

मराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार
SHARES

मराठी शाळेत (Marathi School) शिक्षण (education) झाल्यामुळे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नोकरी (job) नाकारल्याचा संतप्त प्रकार समोर आला आहे. शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र १०२ उमेदवारांना दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेने डावलत नोकरीपासून वंचित ठेवले आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या या अजब कारभाराबाबत आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

पवित्र पोर्टलच्या माध्यमांतून मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शाळांमध्ये १०२ शिक्षकांची (teacher) निवड करण्यात आली. डिसेंबर २०१७ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळांसाठीही निवड करण्यात आली. मात्र, पात्र १०२ उमेदवारांचं दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत असल्यामुळे त्यांना इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही, असं कारण महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिलं आहे. विशेष म्हणजे या शिक्षकांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालं आहे. तरीही त्यांना या नोकरीमध्ये डावललं गेलं आहे. मात्र, ज्या उमेदवारांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेय त्यांची ताबडतोब नेमणूक करण्यात आली आहे. 

पालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये (english school)  नियुक्ती झालेल्या शिक्षकांना मुलांना इंग्रजी शिकवता आलं पाहिजे. मात्र, दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं म्हणून पात्र उमेदवारांना डावलणंं योग्य नाही. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. दरम्यान,  महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही. मराठी शाळेतून शिकलेल्या पात्र उमदेवारांना डावललं गेलं तर ही भरतीचं आम्ही होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेच्या अभिजीत पानसे यांनी दिली आहे.



हेही वाचा -

आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट

मुंबईतील 'या' स्थानकांवर होते सर्वाधिक मोबाइल चोरी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा