मुंबईतील 'या' स्थानकांवर होते सर्वाधिक मोबाइल चोरी

मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दिवसाला तब्बल ६६ मोबाइल (mobile) चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे पोलिसांनी (Railway Police - grp) जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

मुंबईतील 'या' स्थानकांवर होते सर्वाधिक मोबाइल चोरी
SHARES

मुंबई (mumbai) ची लोकल ट्रेन (local train) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लाखो मुंबईकर या लोकलने रोज प्रवास करत असतात. मात्र, ही लोकल आता चोरट्यांची (theft) एक खाणच झाली आहे. मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दिवसाला तब्बल ६६ मोबाइल (mobile) चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे पोलिसांनी (Railway Police - grp) जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

उपनगरीय लोकलचं जाळं ३५० किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)  ते खोपोली (khopoli), कसारा (kasara),  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल (panvel) आणि चर्चगेट (Churchgate) ते डहाणू ( Dahanu ) अशी लोकलसेवा आहे. रोज ८० लाख लोक लोकलमधून प्रवास करतात. लोकलमधील वाढत्या गर्दीचा फायदा मात्र मोबाइल (mobile) चोरट्यांनी मोठा घेतला आहे. मागील वर्षात म्हणजे २०१९ मध्ये जीआरपी पोलीस स्थानकात तब्बल २४ हजार १० मोबाइल चोरीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये चोरीला गेलेल्या या मोबाइलची किंमत ३ कोटी रुपये आहे. तर २०१८ मध्ये ३२ हजार ४७६  मोबाइल चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. २०१८ मध्ये दिवसाला सरासरी ८८ मोबाइल चोरीला गेले आहेत. 

गर्दीच्या स्थानकांवर मोबाइल चोरटे (mobile theft) आपला कार्यभाग साधत असल्याचं दिसून आलं. आहे. मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटनांची नोंद कुर्ला (kurla), ठाणे (thane) आणि बोरीवली (boriwali) स्थानकावर करण्यात आली आहे. गर्दीमध्ये चोरट्यांना मोबाइल चोरणं सोपं जात असल्याने या गर्दीच्या तीन स्थानकांमध्ये सर्वाधिक मोबाइल (mobile) चोरी झाले आहेत. लोकलच्या दारावर मोबाइल घेऊन उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडून मोबाइल हिसकावून चोरटे पळ काढत असतात. मोबाइल चोरल्यानंतर चोरटे मोबाइल बंद करतात. त्यानंतर हा चोरीचा मोबाइल ते चोर बाजारात विकतात. या मोबाइलचा आयएमई क्रमांकही बदलला जातो. असे मोबाइल दुसऱ्या राज्यातही विकले जातात. त्यामुळे असे चोरीला गेलेले मोबाइल पुन्हा मिळणे अशक्य होते. 

 रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या अशा मोबाइल ((mobile)) पैकी अवघे १० टक्के मोबाइल शोधण्यास यश येतं. २०१९ मध्ये चोरीला गेलेल्या २४ हजार १० मोबाइलपैकी फक्त २३१९ आणि २०१८ मध्ये ३२ हजार ४७६ मोबाइलपैकी केवळ २५१७ मोबाइल सापडले आहेत. 2019 मध्ये मोबाइल चोरी प्रकरणात ५७२४ जणांना पकडण्यात आलं आहे. यामधील २३४ चोरटे अल्पवयीन आहेत.हेही वाचा -

लोकलमधून पडून तरुण जखमी, एक पाय निकामी

कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

गुगलवर गॅस गळतीची तक्रार करणे पडले महागात
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा