Advertisement

लोकलमधून पडून तरुण जखमी, एक पाय निकामी

धावत्या लोकल ट्रेन (local train) मधून तरुण पडल्याची घटना भांडुप स्थानकात (bhandup Station) घडली. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे. विनायक तुकाराम नादर्गी (३४) असं या तरुणाचं नाव आहे.

लोकलमधून पडून तरुण जखमी, एक पाय निकामी
SHARES

 धावत्या लोकल ट्रेन (local train) मधून तरुण पडल्याची घटना भांडुप स्थानकात (bhandup Station) घडली. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे. विनायक तुकाराम नादर्गी (३४) असं या तरुणाचं नाव आहे. या अपघातात (accident) विनायकचा पाय निकामी झाला आहे. त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.  भांडुप (bhandup) आणि कांजूरमार्ग (kanjurmarg) स्थानकादरम्यान तरूण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना (Railway Police) मिळाली. पोलिसांना तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. विनायकच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं यावेळी रेल्वे पोलिसांना दिसून आली. पोलिसांनी तातडीने विनायकला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राजावाडी रुग्णालयात दाखल केले. विनायक गंभीर जखमी झाल्याने त्याला त्यानंतर सायन रूग्णालयात (Sion Hospital) दाखल करण्यात आलं. 

धावत्या लोकलमधून पडल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, चौकशीनंतर अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल. विनायकवर सायन रूग्णालयात (Sion Hospital) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी सांगितले.



हेही वाचा -

कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

गुगलवर गॅस गळतीची तक्रार करणे पडले महागात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा