गुगलवर गॅस गळतीची तक्रार करणे पडले महागात

संपर्क क्रमांवर भामटा निघाल्याने त्याने गृहिणीला तब्बल 2 लाखांना चूना लावला

गुगलवर गॅस गळतीची तक्रार करणे पडले महागात
SHARES

गुगल (Google)वरील प्रत्येक माहिती खरीच असते, यावर विश्वास ठेवत असाल, तर तुम्हाला महागात पडू शकतं. असा एक प्रकार मालवणी (Malwani) येथील गृहिणीला नुकताच महागात पडला आहे. घरातील गॅस (GUS) लिक झाल्यामुळे तिने गुगलवर संपर्क नंबर शोधून त्यावर संपर्क केला.  परंतु तिचा घात झाला संपर्क क्रमांवर भामटा निघाल्याने त्याने गृहिणीला तब्बल 2 लाखांना चूना लावला आहे. या प्रकरणी मालाड(Malad)च्या मालवणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- सैन्य आणि पोलिसांच्या गाड्यांना फास्टॅग बंधनकारक

मालवणीच्या म्हाडा काँलनी परिसरात राहणारे खान कुटुंबिय शिर्डी येथे धार्मिक कामानिमित्त गेले होते.  तीन ते चार दिवस घर बंद होते. मात्र खान कुटुंबिय घरी परतताच, त्यांना घरातून गॅस गळतीचा दुर्गंध येऊ लागला. गॅस गळतीमध्ये अचानक विद्युत पुरवठा सुरू केल्यास आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी घरातील विद्युत पुरवठा सुरू केला नाही.  गॅस गळती रोखण्यासाठी त्या गॅस पुरवठा करणाऱ्यांचा संपर्क शोधू लागल्या, मात्र गोंधळात वेळेत नंबर मिळत नसल्यामुळे त्यांनी गुगलवर सर्च केला. त्यावेळी ‘भारत गॅस कस्टमर केअर’ (Baharat gas customer care) या कंपनीचा नंबर शोधला. महिलेने वेळ न घालवता. त्यावर संपर्क केला असता. महिलेला विश्वासात घेण्यासाठी त्याने ग्राहक नंबर मागितला. त्यानुसार महिलेने तो दिला. त्यानंतर फोनवरील व्यक्ती एकएक करून सर्व माहिती विचारत होता आणि महिला त्याला माहिती सांगत होती.

हेही वाचाः- गोयल कधीतरी मुंबईत येतील, मनसेचा इशारा

काही मिनिटात महिलेच्या मोबाइलवर एका मागून एक आठ ते दहा मेसेज आले.  चोरट्यांनी टप्या टप्याने महिलेच्या खात्यातून तब्बल २ लाख रुपये काढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मालवणी पोलिस ठाणे गाठत, संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे गुगलवर प्रत्येक माहिती ही खरी असते असं नाही. त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा