Advertisement

सैन्य आणि पोलिसांच्या गाड्यांना फास्टॅग बंधनकारक

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल वसूल करणाऱ्या सर्व कंपन्यांना गाइडलाइन पाठवली आहे.

सैन्य आणि पोलिसांच्या गाड्यांना फास्टॅग बंधनकारक
SHARES

सैन्याचे जवान अथवा पोलीस कर्मचाऱ्यांना आता टोल नाक्यावरून खाजगी वाहनातून जाताना ओळखपत्र दाखवून जाता येणार नाही. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल वसूल करणाऱ्या सर्व कंपन्यांना गाइडलाइन पाठवली आहे.

फास्टॅग का गरजेचं?

सध्या खूप कमी सरकारी वाहनांवर फास्टॅग लावण्यात आलेले आहे. पण येत्या काळात सैन्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांना फास्टॅग लावणं गरजेचं आहे. जर फास्टॅग नसेल तर त्यांना रोख रक्कम लेनमधून जावं लागेल. फास्टॅग लेन मधून गेल्यास त्यांना दुप्पट टोल द्यावा लागेल.

म्हणून नियमात बदल

सैन्याचे जवान ड्यूटिवर असताना सरकारी वाहनात असतील तर त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही. मात्र या वाहनांवर फास्टॅग लावावा लागेल. फास्टॅगची व्यवस्था सुरू होण्यापूर्वी सैन्याचे जवान ड्यूटीवर नसताना देखील सरकारी ओळखपत्र दाखवून खाजगी वाहनानं विना टोल भरता जात असत. मात्र अनेक ठिकाणांवरून बनावट ओळखपत्रांची तक्रार आल्यानं नियमात बदल करण्यात आले.



हेही वाचा

वाहतुकीचे नियम न पाळल्यास परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

सुरक्षित प्रवासासाठी उबेरचे ३ नवे फिचर्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा